चंदन हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या सडपातळ, सरळ अथवा वाकड्या असतात. याची उंची साधारणपणे १२ ते १५ मिटर असून घेर २ ते २.५ मिटरपर्यंत असतो. याची पाने सदाहरित, अंडाकार, टोकदार, समोरा – समोर व देठाकडे निमुळती असतात. खोड लहान व कमी जाडीचे असते तेव्हा मऊ असते. परंतु जस – जसे झाड मोठे होते तसे त्याची साल खरबरीत व उभ्या चिरा असलेली बनत जाते. याचे लाकूड कठीण, सुक्ष्म दाणेदार कणांनी बनलेले तेलयुक्त असते. लाकडाचा बाहेरील भाग सफेद व सुगंधहिन असतो. तर आतील गाभा पिवळसर ते तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो. यामध्ये तेलाचे प्रमाण १ ते ६% असते.चंदनाचे मूळ हे सुरूवातीस बऱ्यापैकी लांब, नाजूक व लवचिक असते. बाजूकडील मुळे संखेने भरपूर, तंतूमय, नाजूक व मुख्य मुळाच्या खाली पसरलेली असतात. सुरुवातीस मुळांवर गाठी असतात. त्याने त्याचे परावलंबीत्व दिसून येते.

अंकुर हायटेक नर्सरी गटनंबर 108 पाखरसांगवी ता जिल्हा लातूर मोबाईल 9423345103-9260000083

चंदनाचे बी एकदल प्रकारातील असून रंग पिवळसर गुलाबी, तपकिरी, गर्द तपकिरी व काळपट असतो. फळाचा वरचा भाग लुसलुशीत व गरयुक्त असून तो काढल्यानंतर बी मिळते. बियाचा वापर उद्योगधंद्यामध्ये करतात. बियापासून ५० ते ६०% पर्यंत सुकणारे कोरडे तेल (ड्राईंग ऑईल) मिळते. ते इन्सुलेशन टेप व वॉर्निश बनविण्यासाठी उद्योगात वापरले जाते. त्याची पेंड जनावरांचे खाद्य व खत बनविण्यासाठी व अगरबत्तीला लागणारा लगदा म्हणून वापरतात.

लागवड:  मान्सून पावसाची सुरुवात होताच जून ते फेब्रुवारी पर्यंत रोपांची लागवड करता येते. याकरीता उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात १६’ x १२’ अंतरावर १.५ x १.५ x १.५ फुटाचे खड्डे खोदून घ्यावेत. खड्डयामध्ये किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करून अर्धा खड्डा सेंद्रिय अथवा कंपोस्ट खत, निंबोळी पावडर गाडूळ खत ने भरून घ्यावा. त्यानंतर एक पाऊस झाल्यावर जमिनीत ओल असताना रोपांची लागवड करावी व शेजारच्या खड्डयामध्ये यजमान वृक्षाच्या रोपांची लागवड करावी. यजमान रोप कालांतराने मरते व चंदन त्याच्या जवळ असल्याने इतर दिर्घायुषी यजमान वृक्षाच्या मुळांमधून आपले आवश्यक ते अन्न शोषण सुरू करते.

अंकुर हायटेक नर्सरी गटनंबर 108 पाखरसांगवी ता जिल्हा लातूर मोबाईल 9423345103-9260000083

चंदन हा अर्धपरजीवी वृक्ष आहे. याला संस्कृत भाषेत ‘शर्विलक’ म्हणतात. शार्विलक म्हणजे चोर. चंदन हे आपणास लागणारी सर्व खाद्यान्ने व जिवनसत्वे स्वत:च्या मुळाद्वारे शोषून घेत असतात. त्याकरिता चंदनाची लागवड करताना त्याच्या शेजारी यजमान वृक्षानी लागवड करावी लागते. चंदनाची वाढ खुरटी राहते व झाड २ – ३ वर्षांनी मरते.
पिशवीतील रोपे लागवडीपुर्वी बुरशी नाशक द्रावण तयार करून पिशवी मध्ये रोपांना ५० ते १०० मिली द्रावणाची आळवणी करावी. नंतर लागवडीच्यावेळी रोपाची प्लॅस्टिक पिशवी अलगद बाजूला काढून रोप लावावे. लागवडीनंतर त्याला पुन्हा वरीलप्रमाणे ड्रेंचिंग (आळवणी) करावी.

अंकुर हायटेक नर्सरी गटनंबर 108 पाखरसांगवी ता जिल्हा लातूर मोबाईल 9423345103-9260000083

यजमान दिर्घायुषी झाडे: साग, सादडा , लिंब, सुरू, पळस, करंज, निलगिरी, बाभूळ, सुबाभुळ, शिरीष, काशिद, खैद, सिसम, अकेशिया, रक्तचंदन, तामण, गावडा, मोह, अंकोल, कुमकुम वृक्ष इ. ची लागवड करता येते.
यजमान मध्यम आयुषी झाडे : यामध्ये हादगा, शेवरी, शेवगा, सुरू, निलगिरी, बांबू, ग्लिरीसिडीया, निरगुडी, पांगारा, बकुळ, कुंचला, बारतोंडी इ.

अंकुर हायटेक नर्सरी गटनंबर 108 पाखरसांगवी ता जिल्हा लातूर मोबाईल 9423345103-9260000083

यजमान फळझाडे : सिताफळ, रामफळ, डाळींब आवळा, बोर.
यजमान खुरटी झुडपे: कन्हेर, रुई, घायपात, गुलतुरा, तरवड ही पिके आहेत.
अभ्यासाअंती असे समजते की, यजमान वृक्ष म्हणून सुरू, करंज, शिरीष, काशिद, साग, सिसम हे वृक्ष चंदनास योग्य/उत्तम समजली गेली आहेत. तर फळझाडांमध्ये आवळा, बोर, सिताफळ, डाळींब आणि मध्यम आयुषी झाडांमध्ये शेवरी, हादगा, पांगारा, शेवगा हे वृक्ष योग्य ठरतात.
आंतरपीक : चंदन व यजमान वृक्षाची लागवड करताना दोन ओळींमध्ये किमान १० फूट जागा उपलब्ध होऊ शकेल. या जागेत पहिले ४ – ५ वर्षापर्यंत हरभरा, उडीद, मूग, भुईमूग अशी आंतरपिके घेतल्यास लागवडीस पोषक वातावरण मिळून चंदनाची वाढ जोमदार होते. आंतरपीक घेताना जमीन नांगरणी/वखरणी केली जाते. शेताला पाणी, खते दिली जातात. कडधान्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. नत्राचे प्रमाण वाढते. या सर्वांचा चंदन वाढीस फायदा होतो. या पिकांबरोबरच औषधी वनस्पतींमध्ये सर्पगंधा, अश्वगंधा, सफेद मुसळी , काळमेघ, भुई रिंगणी, शतावरी, कोरपड, अशी पिके घेता येतात.

अंकुर हायटेक नर्सरी गटनंबर 108 पाखरसांगवी ता जिल्हा लातूर मोबाईल 9423345103-9260000083

जमीन: लाल, काळी, चिकणमाती ते वाळू मिश्रीत लोहयुक्त अशी कुठलीही जमीन चंदनास मानवते, परंतु उत्तम निचरा होणारी, उत्तम उपजावू चिकण माती व नदी काठच्या निचऱ्याच्या पोयटायुक्त जमिनीत चंदनाची वाढ अगदी जोमाने होते. पाणी दिल्यानंतर विस्तारणारी माती, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशयुक्त जमीन झाडाची उंची व घेर वाढीस फायदेशीर ठरते. जमिनीचा सामू हा ६.५ ते ८.२ असणारी जमीन चंदन लागवडीस योग्य समजली जाते. चंदनाचा गाभा आणि त्यापासून निघणारे तेल हे एक आर्थिककदृष्ट्या महत्त्वाचे उत्पादन आहे. अभ्यासाअंती असे लक्षात येते की खडकाळ, दगडयुक्त व कोरड्या भागातील चंदनापासून मिळणारे तेलाचे प्रमाण हे सुपीक जमिनीपासून मिळणाऱ्या चंदनाच्या तेलापेक्षा अधिक असते. परंतु दोन्ही प्रकारच्या जमिनीतून मिळणाऱ्या चंदनाच्या तेलाची गुणवत्ता सारखीच आढळते.

हवामान : चंदनाने झाड हे ६०० ते १६०० मि.मी. पर्जन्यमान असलेल्या पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात व १२ डी ते ४५ डी. से. तापमानात चांगले वाढते. साधारणपणे थंड हवा, मध्यम पर्जन्यमान व भरपूर सुर्यप्रकाश तसेच भरपूर काळ कोरडी हवा चंदनास उत्तम ठरते.

अंकुर हायटेक नर्सरी गटनंबर 108 पाखरसांगवी ता जिल्हा लातूर मोबाईल 9423345103-9260000083

2 thoughts on “चंदन लागवड

  1. वेगळ्या वाटेवरचा धनंजय
    वयाच्या वीस-बावीस वर्षांनंतर मित्रांकडून नाशिक येथील मुक्त विद्यापीठातील अभ्यासाबाबत कळले. त्यात रस घेऊन २००२ ला तो ‘ग्रॅज्युएट’ झाला. त्यामुळे इंग्रजीचेही ज्ञान वाढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *